संभोग करणं ही मनाला आणि शरीराला आनंद देणारी लैंगिक कृती आहे हे जरी मान्य असले तरी , लैंगिक कृतीमध्ये समोरील व्यक्तीची समंती असणं गरजेचं असतं हे ही ध्यानात घ्यावे लागेल. अन्यथा तो बलात्कारच असतो. तुम्ही त्यांच्या सोबत याबाबत बोलणं झालं आहे का? त्यांची परवानगी आहे का यासाठी ?
तुमच्या प्रश्नामधला महत्वाचा भाग हा आहे की, अशा नात्यामध्ये लैंगिक संबंध ठेवणं कितपत योग्य आहे हे तुम्हाला ठरवावं लागेल. कदाचित अशा लैंगिक संबंधामुळं नात्यांमध्ये जास्त गुंतागुंत होण्याची शक्यता असते. शिवाय तुमच्या या नात्याबद्दल इतरांना कळालं तर जे परिणाम होतील त्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागेल. अनेकवेळा अशा नात्यांमुळं स्त्रियांची बदनामी पुरुषांच्या तुलनेत जास्त होते. तुम्हाला हे योग्य वाटतं का?