प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलैंगिक अवयवांच्या आजुबाजूचे केस काढण्यासाठी ब्लेड चा वापर करण्यापेक्षा इतर कुठले क्रीम वापरवे plz guide
1 उत्तर

लैंगिक अवयवांच्या आजूबाजूचे केस लैंगिक अवयवांचं रक्षण करत असतात. स्वच्छता ठेवण्यासाठी ते वाढू न देणं आणि त्यामध्ये घाण जमा होऊ न देणं गरजेचं असतं. मात्र हे केस पूर्णपणे काढून टाकण्याची गरज नसते. कात्रीचा वापर करून ते बारीक कापता येऊ शकतात. ब्लेडने इजा होऊ शकते त्यामुळे त्याऐवजी कात्री वापरा.
हर्बल किंवा इतर कोणत्याही क्रीममध्ये काही रसायनं असतात ज्याचा लैंगिक अवयवांच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्यातून खाज आणि आग होऊ शकते. त्यामुळे क्रीमचा वापर टाळणं चागलं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 9 =