आपल्या शरीराविषयी असलेल्या नकारात्मक भावना आपल्या आयुष्यावर खूप खोल परिणाम करत असतात. या भावना दूर करण्यासाठी त्या आधी कशातून निर्माण झाल्या याचा शोध घ्या. बाळ झाल्यावर स्तनपान केल्याने फिगर खराब होते यासाठी स्तनपान टाळणाऱ्या अनेकींच्या कहाण्या पेपरमध्ये आपण वाचतो. तसंच बाळ झाल्यावर दोन महिन्यात पूर्वीसारखी फिगर परत मिळवणाऱ्या स्टार, सेलिब्रिटींचे फोटोही आपण पाहत असतो. या सगळ्याचा परिणाम कळत न कळत आपल्या स्व-प्रतिमेवर आणि स्वतःच्या शरीराबद्दल असणाऱ्या आपल्या भावनेवर होत असतो. मात्र एक लक्षात घ्या. बाळ होणं, स्तनपान, स्तनांचा आकार बदलणं, शरीराचा आकार बदलणं या गोष्टी नैसर्गिक आहेत त्या बदलांचा भाग आहेत.
स्तनांचा आकार पूर्ववत होईल असा साधा कोणताच उपाय नाही. शस्त्रक्रियेचा वापर करून स्तनांच्या आकारात बदल घडवून आणता येऊ शकतो. स्तनांना आधार देणाऱ्या, स्तन उचलून धरणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रा-ब्रेसियर बाजारात उपलब्ध आहेत त्यांचा वापर करून पहा. बसताना पोक काढून बसत असाल तर आधी बसण्याची उभं राहण्याची पद्धत बदला. पाठ आणि खांदे ताठ ठेवलेत तरी तुमचं शरीर आकर्षक दिसू शकतं.
वयाप्रमाणे स्तनांच्या स्नायूंचा ताठरपणा कमी होतोच. तुम्हाला याचा खूपच त्रास होत असेल तर शस्त्रक्रियेशिवाय दुसरा मार्ग नाही. त्याची माहिती एखाद्या त्या क्षेत्रातील स्पेशलिस्ट, प्लास्टिक सर्जनकडून घ्यावी लागेल.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा