तुमचा प्रश्न नीट समजला नाही. पण खाली त्याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करत आहोत, जर तुम्हाला अपेक्षित उत्तर नाही मिळाले तर तुम्ही पुन्हा विचारु शकता.
आम्हाला जो अर्थ लागला तो असा की,
जर तुम्ही पुरुष आहात तर, संभोग करताना किती वेळा वीर्यपतन होते.
संभोग करताना वीर्यपतन एकदाच होते. पण जर तुमचा प्रश्न संभोग किती वेळा करू शकतो असा असेल तर, एकदा वीर्यपतन झाल्यावर लिंगाला पुन्हा ताठरता यायला जेवढा वेळ लागतो, तेवढा वेळ घेऊन म्हणजेच तुमच्या मनाची तयारी व शरीराने किती वेळा (थकवा) शक्य होऊ शकेल याचा अंदाज घेऊन हवे तितक्या वेळा तुम्ही संभोग करु शकता. परंतू ज्यांच्यासोबत संभोग करत आहात त्यांची संमती/परवानगी घेणेही तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे हे पूर्णपणे तुमच्यावर व तुमच्या जोडीदारावर अवलंबून आहे.
जर तुम्ही महिला आहात तर, Discharge चा अर्थ योनीस्त्राव किती वेळा यावा असा असल्यास, लैंगिक इच्छा झाली आणि लैंगिक उत्तेजना मिळाली की, योनीमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि योनीच्या आतील स्राव वाढून योनीमध्ये ओलावा वाढतो. स्त्रीच्या मनात सेक्स करण्याची इच्छा नसेल किंवा उत्तेजना मिळाली नसेल तर योनीमध्ये ओलसरपणा तयार होत नाही.