प्रश्नोत्तरेsambhog veli lovker shut hot nahi bai vaitagun jate

1 उत्तर

खरं आहे मित्रा. गरजेपेक्षा अधिक वेळ पुरुषाने घेतला तर बाई जोडीदार वैतागणारच झाली. वैतागाला कारणही आहेच. एकतर तिची इच्छा कमी झालेली असते किंवा अनावश्यक लिंग संपर्काने दुखायलाही होते.

तुमची समस्याही खरी आहे. खूप कमी पुरुषांमध्ये ती आढळते. बहुतेक पुरुष शीघ्रस्खलनाची/शीघ्रपतनाची तक्रार करतात. पण काही विशिष्ट कारणाने विलंबित स्खलन स्थिती येते आणि ते त्रासदायक ठरू शकते. उदा. तुम्ही काही विशिष्ट प्रकारची औषधे घेत असाल तर त्याचा हा परिणाम असू शकतो. दुसरे म्हणजे वयोमानापरत्वे लिंगातील नसांमध्ये संवेदनशीलता कमी होऊन शिथिलता येऊ शकते. लिंग पुरेसे ताठर होत नसेल तरीसुद्धा स्खलन लांबू शकते. एखाद्या ऑपरेशन दरम्यान नसेला इजा पोचणे, दारूचे सेवन, ग्रंथीमधील बिघाड, पुरेशी झोप नसणे, चिंता अशी कारणेही यामागे असू शकतात. आणखी एक शक्यता असू शकते. जे पुरुष नियमित हस्तमैथुन करतात त्यांना जोडीदारा समवेत योनीप्रवेशी कामशांती मिळवण्यात अडथळा येऊ शकतो. कारण हस्तमैथुनात जेवढा जोर किंवा दाब पुरुष स्वतः आपल्या लिंगावर देत असेल तेवढा योनी प्रवेशाच्या वेळी कदाचित नाही पडणार.

अशा आणि इतर अनेक गोष्टी विलंबित स्खलनासाठी कारणीभूत असू शकतात. तुमच्या बाबत काय कारण असेल हे आम्ही सांगू शकत नाही. पण आमचा सल्ला आहे की जर शक्य असेल तर तुम्ही एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटा अथवा न लाजता तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जाता जाता आणखी एक गोष्ट. या कारणाने आपल्या जोडीदाराला कंटाळा येत असेल किंवा दुखत असेल तर तुम्हाला आणि त्यांना मान्य असणारया संभोगाच्या वेगळ्या पद्धती तुम्ही ट्राय करू शकता उदा. हस्तमैथुन, मुखमैथुन इ. ऑल दि बेस्ट..

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 18 =