प्रश्नोत्तरेsarske yoni mukhmaithun kelyane kay hote

1 उत्तर

जोडीदाराच्या संमतीने मुखमैथुन केले तर काहीच होत नाही. जोडीदारांनी एकमेकांच्या लैंगिक अवयवांना जिभेने चाटणे अथवा लिंग तोंडात घेणे याला मुखमैथुन असं म्हणतात. जर दोन्ही जोडीदारांची इच्छा असेल, दोघांनाही त्यातून आनंद मिळत असेल तर त्यात गैर काही नाही. तसेच हे योनीतून येणारा स्राव तोंडावाटे शरीरात गेला तरीही तो शरीरासाठी हानिकारक नसतो. मात्र मुखमैथुन करताना योनीचा भाग स्वच्छ असायला हवा. योनीमार्गामध्ये कधी कधी जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. असा काही जंतुसंसर्ग झाला असेल तर त्यावर उपाय करावा. अशा वेळी मुखमैथुन करू नये. काही जणांना मुखमैथुन करणे किळसवाणे वाटू शकते. त्यामुळे दोन्ही जोडीदारांना यातून आनंद मिळतोय का याचा विचार करणे आवश्यक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 11 =