एकमेकींच्या जवळ जाणे, मिठी मारणे, तुम्ही म्हणता तसा नॉर्मल स्पर्श करणे, मैत्रीपूर्ण चुंबन घेणे (कदाचित कपाळावर, गालावर) या गोष्टींनी त्यात मनःपूर्वक सामील असलेल्या व्यक्तींना आनंदच वाटणार नाही का! मैत्री व्यक्त करण्याच्या या पद्धती आहेत. आपल्यासारख्या बंदिस्त समाजात विशेषतः स्त्रियानी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जिवंत ठेवलेल्या या नितांत सुंदर पद्धती आहेत.(ज्यांपासून सहसा पुरुष कोसो दूर असतात. वास्तवात पुरुषांना आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात, बोलून दाखवायच्या असतात याचे ट्रेनिंगच दिले गेलेले नसते)
वरील कृती जर स्त्रियांनी लैंगिक अर्थाने, संमती घेऊन केल्या गेल्या असतील तरीही त्यातून आनंद मिळणारच. आणि त्यात वावणं काहीच नाही. फक्त तुम्ही म्हणता त्या प्रमाणे सर्वच स्त्रिया अशा कृती लैंगिक अर्थाने करत नसतात.