ब्रह्मचर्य. वीर्यस्खलन होऊ न देणे. लैंगिक संबंधांपासून दूर रहाणे. भारतीय आणि काही प्रमाणात आशियाई देशांमधील काही पारंपारिक कल्पनांनुसार विर्याचा संबंध शारीरिक आणि मानसिक शक्तीशी लावला जातो. त्यामुळे वीर्य‘नाशातून’(म्हणजे लैंगिक संबंधामध्ये किंवा हस्तमैथुन करण्यातून जे वीर्य पुरुषाच्या शरीरातून बाहेत पडते) पुरुष कमजोर होतात, ते मानसिकरित्या कमकुवत होतात, पौरुष्य कमी होते, पुरुषार्थ गाजवण्यात अडथळे येतात अशा समजुती आहेत. लैंगिकता केवळ प्रजोत्पादनासारख्या सामाजिक कार्यासाठी व्यक्त व्हावी, लैंगिक सुख हे इतर गोष्टींच्या मानाने कमी दर्जाचे असते, लैंगिकतेची अभिव्यक्ती पुरुषांना दिव्य मार्गावरून दूर नेते ई समज त्यातूनच निर्माण झाले आहेत. म्हणून ब्रह्मचारी जीवनाचा पुरस्कार काही मंडळी करतात. आता, हा एक विचार आहे. तो किती मनावर घायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा