1 उत्तर
नाही ओळखता येणार. जशी मुलाची पहिली वेळ आहे की दुसरी की दहावी आहे हे ओळखता येणार नाही त्या प्रमाणेच. शिवाय जर मुलाची कितवी वेळ आहे यात सहसा कोणाला इंटरेस्ट नसतो तसंच मुलींबाबतही नसावा नाही का? आणि माझा उलट प्रश्न आहे की ते तुम्हाला का ओळखायचे आहे? ही माहिती घेऊन तुम्हाला त्याचा काय उपयोग होणार आहे? एखाद्या व्यक्तीसोबत नात्यात प्रवेश करण्यासाठी ही अट असेल तर अशा नात्यात प्रवेश न केलेलाच बरा. नाही का!
आपले उत्तर प्रविष्ट करा