Sex pasun vanchit ahe asked 7 years ago

Maz vay 29 varshe ahe, mi ataparent kadhi sex kela nahi, sex karnyachi tivra echha Nirman hote pan changla patenar millat nahi, vaishe kade jaun sex karnyan \’HIV\’ honyachi bhiti vatate, manun sex pasun vanchit ahe, pudhe kahi problem Nirman hotil ka.?

1 उत्तर
Answer for Sex pasun vanchit ahe answered 7 years ago

वेश्या व्यवसायामध्ये विशेषकरून महिलांना बऱ्याचवेळा जबरदस्तीने आणले जाते त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात शोषण होत असते. वेश्या व्यवसायामध्ये ग्राहक सेक्सची मागणी करतो आणि समोरील पुरवठादार व्यक्तीकडून सेक्सची सेवा ठराविक मोबदल्यात पुरवली जाते. ग्राहक आणि विक्रीदार दोघेही भावनिक गुंतवणूकीची अपेक्षा करत नाही. या प्रक्रियेमध्ये फक्त ग्राहकाला आनंद मिळण्याची शक्यता गृहित धरली जाते. पण कदाचित शरीरविक्रेय करणाऱ्या महिलेसाठी ती तितकीच आनंदायी कृती असेलच असं नाही. त्यामुळे वेश्येसोबत सेक्स करावा की नाही यापेक्षा वेश्येसोबत सेक्स करून तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला सेक्सचा आनंद घेता येणार आहे का? हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे.

वेश्यांचे त्यांच्या व्यवसायाचा भाग म्हणून एकापेक्षा अनेक व्यक्तींबरोबर लैंगिक संबध येतात हे तुम्ही जाणतच असाल. त्यामुळे त्या स्वतः लैंगिक आजाराची शिकार असू शकतात किंवा त्यांच्याशी संबध ठेवणाऱ्या व्यक्तींनाही लैंगिक आजार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे जर तुम्ही वेश्येसोबत किंवा इतर कोणासोबतही सेक्स करणार असाल तर माञ काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जसं निरोध वापरणं, मुख मैथून(oral sex) करताना तोडांत जखम तर नाही ना हे पाहणं, लैंगिक आजारांबद्दल माहिती घेणं आवश्यक आहे. याशिवाय लैंगिक संबंध आनंददायी होण्यासाठी कोणतीही जबरदस्ती न करता परस्परांचा आदर राखणं, कोणत्या कृतीमुळे जोडीदाराला आनंद मिळतो हे पाहणं आणि खाजगीपणा जपणं या गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहे.

सेक्स कोणाबरोबर करायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुमच्यासाठी काय योग्य आहे हे आपण स्वतःच जास्त चंगल्या प्रकारे ठरवू शकाल. सेक्स पासून वंचित राहिल्याने ठळक अशा काही अडचणी निर्माण होतात हे सांगता येणार नाही. पण सेक्स ही एक महत्वाची शारीरिक गरज आहे हे मात्र नक्की. कोणाच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबध ठेऊ नयेत. जोडीदार मिळत नसेल तर हस्तमैथुन हा देखील लैंगिक आनंद मिळविण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 7 =