sex asked 7 years ago

Namaskaar sir maja prashns asa ahe ki jyaveles ling taath hote tar sex aadhi tyaveles pratyek purushala joraat laghvi lagte ka aani sex nanter pan lagte ka sanghave plzzz tasech majhya gotya var yetaat lingchya tyacha kahi problem tar nahi honaar na

1 उत्तर
Answer for sex answered 7 years ago

नाही. सेक्सदरम्यान किंवा लिंग ताठ होते त्यावेळी प्रत्येक पुरुषाला जोरात लाघवी लागत नाही. तुला जर असा काही त्रास होत असेल तर यासाठी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घे. अगदी न लाजता.

तुझा गोट्या/वृषण/बीजकोष याविषयीचा नेमका प्रश्न काय आहे ते समजले नाही. म्हणून याविषयीची माहिती देत आहे. तुला जर आणखी काही विशिष्ट प्रश्न असेल तर कृपया स्पष्टपाने आणि विस्ताराने विचार म्हणजे आम्हाला उत्तर देणं सोप्पं जाईल.

वृषण व बीजकोष

शिश्नाच्या खालील बाजूस वृषण असते. या वृषणामध्ये दोन बीजकोष असतात. या दोन्ही बीजकोषाचा आकार सारखाच असतो असं नाही. पोटात जिथे मूत्राशय असतं, त्याच्या मागच्या बाजूला दोन वीर्यकोष असतात. बीजकोषात पुरुषबीजं तयार व्हायला लागतात. पुरुषबीजं बीज कोषातून बाहेर पडून बीजवाहक नलिकेतून वीर्यकोषात जातात. वीर्यकोष व त्याच्या शेजारील प्रोस्टेट ग्रंथीमधून वेगवेगळे स्त्राव स्त्रवतात आणि ते वीर्यकोषात साठेवले जातात. त्यात एक चिकट पांढरा पदार्थ तयार व्हायला लागतो त्यालाच वीर्य असे म्हणतात. तयार झालेले वीर्य शिश्नातून बाहेर पडते.

शरीरामध्ये वीर्यनिर्मिती सातत्याने चालू असते. वीर्यामध्ये शुक्राणू आणि इतर घटक पदार्थ असतात. शुक्राणूमुळे गर्भधारणा होऊ शकते. शुक्राणूंच्या निर्मितीसाठी शरिराच्या तापमानापेक्षा कमी तापमानाची गरज असते. त्यामुळे वृषण शरीरापासून थोडे वेगळे असतात. बीजकोष हे जास्त संवेदनशील असतात. जेव्हा बीजकोषाजवळील तापमान थंड असते, त्यावेळेस वृषण आकुंचन पावतात, तर जेव्हा तापमान जास्त असते त्यावेळेस वृषण प्रसरण पावतात. कारण शुक्राणू तयार होण्यासाठी बीजकोषाला एका विशिष्ट तापमानाची गरज असते. आकुंचन आणि प्रसरण या क्रियांवर आपले नियंत्रण नसते. शरीराच्या तापमानापेक्षा वृषणाचे तापमान कमी असते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 6 =