aamchi social networking site vr olakh 1 week aadhi zali. tech 23 vay aahe n maza 21 aahe. aata tila mazya sobat sex karaycha aahe,tr sex kartana konti khaberdari gyavi ?
शरीर संबंधांसाठी त्यात सामील व्यक्ती या कायद्याने सज्ञान असणे आवश्यक आहे. तसे तुम्ही आहात. त्यामुळे याबद्दलचा निर्णय सर्वस्वी तुमचाच असणार आहे. तसेच शरीर संबंधांसाठी त्यात सामील व्यक्तींची संमती असणे आवश्यक असते. शिवाय असे संबंध सर्वार्थाने सुरक्षित असावेत. म्हणजे अवांछित गर्भधारणा आणि लैंगिक आजार टाळण्यासाठी योग्य ती खबरदरी घ्यायला हवी. आता तुम्ही म्हणता त्या प्रमाणे तुम्ही आठवड्यापूर्वीच भेटला आहात, तेही प्रत्यक्षात की नाही ते माहित नाही. मी म्हणेन स्वतःलातरी थोडा वेळ घ्या. घाई अनेकदा उपयोगाची नसते किंवा अपायकारक ठरू शकते. त्या व्यक्तीला भेटा, तिला जाणून घ्या,एकमेकांना थोडा वेळ द्या मग ठरावा. बघा..