प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsSex chi bhuk bhagavanyasathi kay karu

Mi yapurvi sex kela aahe tyala 3 vars he zali aahet. Mi sadhya 30 varshacha aahe. Maz ajun lagn nahi zal.pan alikade mala khup sex karu vatato pan hasthamaithun karayala mala aavadat nahi
Mazi sex chi bhuk bhagavanyasathi mi kay karu?

2 उत्तर

तुम्ही विचारलेला प्रश्न महत्वाचा आहे. अनेकदा सेक्स करण्याची इच्छा झाल्यावर तणाव निर्माण होतो. हा ताण हलका करण्यासाठी हस्तमैथुन हा सर्वात सुरक्षित आणि कोणतेही तोटे नसलेला उपाय आहे. मात्र तुम्हाला जर हस्तमैथुन करायला आवडत नसेल तर तुम्ही तुमचा जोडीदार शोधू शकता. सेक्स करण्यापूर्वी दोन्ही जोडीदारांची तयारी आहे का? दोघेही सज्ञान (१८ वर्षे पूर्ण) आहेत का? दोघानाही  सेक्स करण्याची इच्छा आहे का? संमती आहे का आणि दोघांनाही तेवढीच ओढ आहे का याचा विचार व्हायला पाहिजे. तुम्हाला जर जोडीदार निवडणेही शक्य नसेल तर जेव्हा लैंगिक इच्छा होईल त्यावेळी तुम्ही तुमचे मन आवडत्या कामांमध्ये रमवू शकता.
मनातल्या इतर भावनांप्रमाणेच सेक्सची किंवा लैंगिक भावना मनात निर्माण होते. वयात येताना, तरुणपणी किंवा आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर लैंगिक भावना मनात येऊ शकतात. त्या शमवण्यासाठी कुणी हस्तमैथुन करतं, कुणी जोडीदार असेल तर सेक्स करतं तर कुणी काही इतर प्रकारे सेक्सची भावना शमवतात. सतत सेक्सबद्दल बोलणं, फिल्म पाहणं, वाचणं या कृतीतूनही अशा इच्छा सतत मनात येऊ शकतात. लैंगिक भावना अनावर होत असतील तर थोडा गांभीर्याने विचार करा. काही साधे उपाय करून पहा. सेक्स सोडूनही किती तरी आनंददायी भावना आहेत, आनंददायी, मन प्रसन्न करणाऱ्या, मनाला छान वाटेल अशा कृती आहेत. त्या करण्याचा प्रयत्न करा. छंद जोपासा, फिरायला जा, एखाद्या गटामध्ये सामील होऊन तुम्ही नेहमी करत नाही अशा काही कामामध्ये सामील व्हा. सामाजिक कामाची आवड असेल तर तसं काम करणाऱ्या एखाद्या गटामध्ये सामील व्हा. तुम्हाला फिरायला आवडत असेल तर ट्रेकिंग, निसर्गसहली, पक्षी निरीक्षण, प्राणी निरीक्षण अशा गोष्टींमध्ये रस घ्या.

mi aata 44 varshacha aahe sex kartana lavkar virya padate kay karu

Jacson replied 7 years ago

Aahe ka uttar

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 20 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी