प्रश्नोत्तरेsex kartana kahi muli tayar ka hot nahi

1 उत्तर

एखादी मुलगी लैंगिक संबंधांसाठी किंवा सेक्ससाठी तयार होत नाहीत यामागे अनेक कारणे असू शकतात. लैंगिक संबंधाविषयी मुलींमध्ये संकोच, भीती, असू शकते. कदाचित फसवणूक होण्याची अथवा गर्भधारणा होण्याचीही भीती मनात असू शकते. तसेच आपल्या समाजामध्ये लैंगिक वर्तनाचे काही नियम ठरवून दिले आहेत त्याचाही प्रभाव असू शकतो. प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी कारणे असतील.      एखाद्या व्यक्तीने सेक्स करावा की न करावा, कधी करावा, कोणाबरोबर करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. एखादी व्यक्ती विशिष्ट निर्णय का घेते यामागे त्या व्यक्तीची जडणघडण, विचार, भावना असू शकतात. तसेच प्रत्येक मुलीने किंवा व्यक्तीने सेक्ससाठी तयारच झालं पाहिजे असाही अट्टाहास नको. प्रत्येकासाठी सेक्सची संकल्पना आणि लैंगिक वर्तन वेगवेगळे असू शकते आणि त्याचा आपण आदरच ठेवला पाहिजे. आपण आपले स्वतःचे  जबाबदार लैंगिक वर्तन ठरवू शकतो पण इतरांचे लैंगिक वर्तन किंवा सेक्सविषयीचा निर्णय हा ज्याने त्याने घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. काहीजण अनेकदा जोडीदारावर विशेषतः मुलींवर सेक्ससाठी दबाव आणतात. काहीजण जोडीदार सेक्स करत नाही म्हणजे तिचं माझ्यावर प्रेमच नाही अशीही गैरसमजूत करून घेतात. पण प्रेमाच्या नात्यामध्ये  सेक्सशिवाय इतरही अनेक गोष्टी असतात त्याचाही विचार करणे गरजेचे आहे. मनात इच्छा नसताना, प्रियकराच्या दबावाखाली सेक्स करण्याचा अनुभव मुलींसाठी खरंच चांगला नसतो. समोरची व्यक्ती मनाने जवळ आल्यानंतर त्या व्यक्तीची इच्छा, मानसिक तयारी असेल तेव्हाच सेक्स जास्त आनंददायी होऊ शकेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 16 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी