प्रत्येकाला सेक्स करताना त्रास होतोच असं सरसकट म्हणता येणार नाही. त्रास होण्याची काही कारणं खाली चर्चिली आहेत.
इच्छेविरुद्ध होणारा लैंगिक संबंध वेदनादायी असू शकतो.
संभोग पूर्व तयारी नसणं – लैंगिक संबंधांमध्ये फोर प्ले चे खूप महत्व आहे त्यामुळे स्त्रीच्या योनीमार्गात पंधरा स्राव तयार होतो आणि तो संभोगा दरम्यान लुब्रीकंट/वंगण म्हणून काम करतो.
सेक्स म्हणजे वेदना ही मानसिकता- बऱ्याचदा ‘सेक्स म्हणजे वेदना’ असे समीकरण अनेकांमध्ये विशेषतः मुलींच्या डोक्यात फिक्स झालेले असते. इतरांचे ऐकलेले वेदनादायी अनुभव आणि एकूणच समाजाची सेक्सकडे बघण्याची दृष्टी याला कारणीभूत असावी.
नको असलेलं गरोदरपण- अनेकदा मुलींना सेक्स केल्याने आपण प्रेग्नंट तर राहणार नाही ना ? याची देखील भीती असते.
भीती आणि दडपण- आपल्या समाजामध्ये योनिशुचीतेला खूप महत्व दिले गेल्याने त्याचादेखील कळत नकळत दबाव मुलींवर असतो. शिवाय आपली फसवणूक तर होणार नाही ना ? अशी देखील भीती काहीजणींच्या मनात असू शकते.
भीती मुळे किंवा लाजत असल्याने संभोग वेळी पाय आखडून घेतल्याने संभोग करताना वेदना होऊ शकते. पण प्रत्येकासाठी आणि प्रत्येकवेळी सेक्स वेदनादायी असेलंच असे नाही.
भीती आणि गैरसमज घालविण्यासाठी आवश्यक मनमोकळा संवाद आणि लैंगिक ज्ञान. योग्य ती शास्त्रीय माहिती मिळाली की शंका, गैरसमज दूर होतील आणि पर्यायाने भीतीदेखील कमी होईल. तसेच संबंध वेदनादायी होऊ नये म्हणून आवश्यक आहे संमती, विश्वास, आणि सुरक्षितता.