sex karu ka? asked 8 years ago

maza natyatli ek mulgi mala sex kar mazashi asa mhanate, me 17 cha ahe ani te 16 chi…te sarkha mala uttejit karat aste,me tila samjavla tri aaikat nahi..me tichyasobat sex karu ki nahi?te tiche Stan mala sarkha pakdayla sangte…sanga sex karu ka nahi…pls

1 उत्तर
Answer for sex karu ka? answered 8 years ago

फारच धाडसी प्रश्न तुम्ही विचारला आहे त्याबद्दल तुमचे अभिनंदन. अशा प्रसंगी आणि विशेषतः तुम्ही ज्या वयात आहात त्या वयात असताना कुणाची तरी मदत घेण्याचं सुचणं ही एक चांगली गोष्ट आहे. असो.
सर्व प्रथम तुमच्या वयासंबंधीच्या तांत्रिकतेविषयी बोलूयात. आपल्या देशातील कायदा सांगतो की तुम्ही दोघंही लैंगिक संबंधांसाठी संमती देण्याच्या वयात नाही आहात. आपल्या देशात १८ पूर्ण हे शरीर संबंधासाठीचे संमती वय आहे. याचा अर्थ १८ वर्षाखालील व्यक्ती ह्या प्रौढ ठरत नाहीत आणि ते लैंगिक नाते संबंध तयार करू शकत नाहीत. कायद्याला ते मान्य नाही. तसेच १८ वर्षे पूर्ण नसलेल्या मुलांसोबत शरीरसंबंध किंवा सेक्स  करणं हा पोक्सो (लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण) कायद्या नुसार लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आहे. आरोपीला मग तो किंवा ती १८ वर्षाखालील असला/ली तरी कायद्याने शिक्षा होऊ शकते. तुमच्या केस मध्ये तुम्ही मोठे असल्या कारणाने तुमच्यावर अधिक जबाबदारी येते. तीन वर्षपूर्वी पर्यंत हेच संमती वय आपल्या देशात १६ असे होते.
आता तुमच्या मुख्य प्रश्ना विषयी.. तुमच्या प्रश्नावरून असे दिसते की तुम्हाला इच्छा नाही पण ती मुलगीच तुम्हाला सेक्स करण्यासाठी प्रवृत्त करत आहे.  अशावेळी आपलं मत ठामपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचवणं गरजेचं आहे. तुमच्या ‘नको’ चा अर्थ ‘नको’ च आहे हे तिला सांगा. पण हा ‘नको’ ठाम आहे की तुम्हालाही ते हवं आहे हे स्वतःला स्पष्ट करा. कारण तसं नसेल आणि तुम्हीही नाही-हो करत असाल तर मग तुमच्यातच संदिग्धता आहे हे समोरच्या व्यक्तीला लक्षात येतं .
शेवटी हे लक्षात घ्या लैंगिक संबंध हे सहज किंवा टाईम पास म्हणून करण्याची गोष्ट नाही. अशा संबंधात प्रवेश करताना अनेक गोष्टींचं भान हवं. विशेषतः दोघांची सुरक्षितता, गर्भ धारणा आणि गर्भ निरोधन, लैंगिक आजारांची शक्यता, तुम्हा दोघांचे भाव जीवन असे अनेक मुद्दे आहेत ज्यांचा विचार व्हायला हवा. तेव्हा योग्य तो निर्णय घ्या आणि काळजी घ्या…

आवाहन

तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.

 

तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 5 =