sex kasa karaycha asked 8 years ago

1 उत्तर
Answer for sex kasa karaycha answered 8 years ago

प्रणय (सेक्स) कसा करायचा हे दोन्ही जोडीदारांनी मिळून ठरवण्याची बाब आहे. परस्परांना आनंद मिळेल, छान वाटेल आणि त्रास होणार नाही या गोष्टींचा मात्र विचार करावा. प्रणय नक्की कसा करायचा, संभोगाच्या कोणकोणत्या पोझिशन्स वापरायच्या याबद्दल शास्त्रीय माहिती देणारी अनेक पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. जर तुम्हाला जोडीदाराशिवाय लैंगिक सुखाचा आनंद घ्यायचा असेल तर हस्तमैथुन हा सर्वात सुरक्षित आणि सोपा उपाय आहे. सेक्स ही मनाला आणि शरीराला आनंद देणारी कृती आहे. एखाद्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवताना त्या नात्यातील प्रेम, विश्वास, आदर, संमती आणि पारदर्शकता महत्वाची आहे. लैंगिक संबंध ठेवताना दोघेही सज्ञान (१८ वर्ष पूर्ण) आहेत का? दोघांचीही ठेवढीच इच्छा, ओढ आणि संमती आहे का? लैंगिक संबंध सुरक्षित आहेत का हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. फसवणूक करून, खोटं बोलून, जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 2 =