आपण सर्वजण पृथ्वीच्याजवळ चिटकून राहतो ते गुरुत्वीय बलामुळं. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम वीर्यालादेखील लागू होतो. संभोगामध्ये स्त्रीची पोजिशन वर असेल तर वीर्य बाहेर येवू शकतं परंतू स्त्रीची पोजिशन खाली असेल तरीही वीर्य बाहेर येवू शकतं. कारण वीर्य हा पातळ-घट्ट पदार्थ आहे. ज्या दिशेला उतार जास्त असेल त्यादिशेने वीर्य जाईल. यात चिंता करण्याचं काहीही कारण नाही. हे अगदी नॉर्मल आहे.
पुरुषाच्या एका वीर्यपतनातून काही लाख शुक्राणू बाहेर पडतात. गर्भधारणेसाठी त्यातील कोणत्याही एका शुक्राणूची गरज असते. शिवाय शुक्राणूंना त्यांची स्वतःची एक गती असते. काही शुक्राणू स्त्रीबीजापर्यंत नक्कीच पोचू शकतात.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा