हे पूर्णपणे सामान्य आहे. वीर्य अनेक घटकांनी बनलेले एक द्रव आहे ज्यात गर्भधारणेसाठी आवश्यक पुरुष बीज असतात. एका स्खलनातून बाहेर आलेल्या साधारण चमचाभर विर्यात करोडोंच्या संख्येने पुरूषबीज असतात. गर्भधारणा होण्यासाठी आवश्यकता असते एका पुरुष बीजाची. शरीर संबंधांच्या वेळी योनीमार्गात पडलेले सर्व वीर्य स्त्रीच्या योनीमार्गातून गर्भाशयात जात नसते. बरेचसे योनीमार्गातून बाहेर पडते. पण तरीही लाखोच्या संख्येने पुरुषबीज गर्भाशयाच्या मुखातून गर्भाशयात प्रवेश कर्ते होतात आणि पुढे स्त्री बीजाच्या शोधात बीज वाहिन्यांमध्ये पोचतात. त्यामुळे चिंता करू नका.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा