हो, गर्भधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गर्भधारणेसाठी एका पुरूषबीजाची आवश्यकता असते. स्त्रीबीज जेव्हा गर्भाशयात सक्रीय असते तेव्हा जर असुरक्षित शरीर संबंध आले असतील तर गर्भधारणा होऊ शकते. वीर्य योनीच्या आत पडू न देता तत्क्षणी लिंग बाहेर काढून घेणे ही गर्भनिरोधनाची पद्धत नाही. ते धोक्याचे आहे. त्यामुळेच सेक्स करताना लिंग प्रवेश न होता वीर्य योनीजवळ पडले काय किंवा योनीच्या वर पडले काय गर्भधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गर्भधारणा नको असेल तर निरोध वापरणे कधी पण योग्य ठरेल.
गर्भधारणा कशी होते हे जाणून घेण्यासाठी आणि गर्भनिरोधाकांविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.