प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsSex madhil interest vadhavayachaa aahe

Majhya lagnala 10 mahine jhale aahet. Pahile tin mahine amache sexual life ekadam chhan chalale hote.

Pan nantar majha sex madhala interest kami jhala aahe.. majha jodidaar majhya ichchheviruddh kadhich sex karat nahi… he is loyel with me .

Amhi khup mokale panane bolato sex vishayi ekamekanshi… Tyachi icchha asate baryachada pan mi naahi mhanale ki to jabardasti karat naahi..

Amhi mahinyatun phakt ekada kinva donada ch sex karato.

Majha interest achanak ka kami jhala asel? Ani to kasa vadhavayacha?

1 उत्तर

पहिल्यांदा डोक्यातून हे काढून टाक की रोज सेक्स केलाच पाहिजे. महिन्यातून किंवा वर्षभरात कितीवेळा सेक्स करावा याचं कोणतही शास्त्रीय प्रमाण नाही. प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी असते. प्रत्येकाचा इंटरेस्टदेखील वेगवेगळा असतो. तुला आणि तुझ्या जोडीदाराला जितक्यावेळा आवडतं तितक्यावेळी सेक्स करणं योग्य आहे. मग ते महिन्यातून किंवा आठवड्यातून एकदा असो. तुमच्या दोघांचा कंफर्ट महत्वाचा. इथे काही शक्यता दिल्या आहेत तुझ्याबाबत सगळ्याच लागू होतील असं अजिबात नाही. तू वाच विचार कर आणि उत्तर नाही मिळालं तर पुन्हा विस्तॄतपणे प्रश्न विचार.

लग्नापूर्वी एकमेकांना परिचित असाल किंवा नसाल मात्र एकत्र येवून राहायला लागला की सुरुवातीला लैंगिक आकर्षण जास्त असणं स्वाभाविक आहे. एकमेकांना जाणून घेण्य़ाची ओढ असते. एकमेकांना समजून घेण्यासाठी सेक्सची मदत होते. कालांतराने जोडीदार एकमेकांसोबत कंफर्ट व्हायला लागले की मग सुरुवातीचं लैंगिक आकर्षण कमी होतं आणि सेक्सचा आनंद वेगवेगळ्या पातळ्यांवर घेण्याचा प्रयत्न केला जातो. मग जोडीदार एकमेकांकडे फक्त सेक्ससाठी पाहत नाही. जोडीदाराच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडत जातात. काही पैलू आवडायला लागतात तर काही पैलू आवडत नाही. जोडीदारासोबत एक कंफर्ट तयार होतो. याला सेक्समधील इंटरेस्ट कमी झाला असं म्हणणं बरोबर नाही.

कदाचित लहानपणी किंवा लग्नापूर्वी मनाविरुध्द झालेल्या अत्याचारांमुळं सेक्सविषयी किळस किंवा चिड तयार होते. नविन नात्यामध्ये त्याच्या आठव्णी पुन्हा जाग्या व्हायला लागतात. आणि मग सेक्स वाईट किंवा घाणेरडा असतो अशी भावना तयार होवून तो टाळलेला बरा असं देखील होवू शकतं. अशा अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर येण्यासाठी जोडीदार किंवा जवळच्या व्यक्तीसोबत शेअरींग केलं तर मदत होते.

लग्न झाल्यावर अनेक वेगवेगळ्या जबाबदार्या देखील वाढतात. लग्न नविन असेपर्यंत त्याची कल्पना येत नाही. हळूहळू जबाबदार्यांची जाणीव व्हायला लागते. त्याचा ताण निर्माण होतो. याचा परिणाम लैंगिक कृतींवर देखील होतो. अगदी ऑफीसमधली किंवा घरातली कामं उरकता उरकता अनेकवेळा थकवा येतो. अशावेळी कामांचं नियोजन योग्य प्रकारे करुन स्वत:साठी वेळ दे.

याव्यतिरिक्त कदाचित सेक्सबद्दल गैरसमज असतील तरीही इंटरेस्ट कमी होवू शकतो. सेक्स करताना वेगवेगळ्या पोजिशन्स ट्राय करणं किंवा दरवेळी पुरुषांनीच पुढाकार घेण्याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःहून पुढाकार घेणं अशा गोष्टी करुन बघ.

वरील शक्यता तुला जशच्या तशा लागू होतील असं अजिबात नाही. कदाचित हे उत्तर तुला अपूर्ण वाटलं असेल तर तुझा प्रश्न विस्ताराने पुन्हा लिहून पाठव. तुझ्या जोडीदारासोबत याविषयी बोल. त्याचं मत घे. समुपदेशकाची गरज वाटत असेल तर ती देखील घे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 1 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी