1 उत्तर
Answer for sex roj karava ki nahi answered 8 years ago

प्रत्येक व्यक्तॊची आवड-निवड वेगवेगळी असू शकते. त्यामुळं संभोग रोज करावा की नाही हा प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा, इच्छेचा किंवा गरजेचा भाग असू शकतो. यामध्ये दुसर्या व्यक्तीपेक्षा तुझं मत जास्त महत्वाचं आहे. मनामध्ये सतत केवळ सेक्सविषयीच विचार येत असतील आणि त्यामुळं दैनंदिन कामं मागे पडत असतील तर विचार करण्याची बाब आहे. संभोग करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतः आणि दुसर्या जोडीदाराचं आरोग्याचा विचार व्हायला हवा. शिवाय तुमची इच्छा तुमच्या जोडीदारासाठी जबरदस्ती तर नाही ना? याची काळजी घेतली पाहिजे. दोघा जोडीदारांनी(प्रौढ) एकत्र येवून केलेली लैंगिक कृती ही दोघांच्या इच्छेने असणं आवश्यक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 12 =