सेक्स करावासा वाटणं म्हणजेच लैंगिक संबध ठेवण्यासची इच्छा निर्माण होणं अगदी नैसर्गिक आहे. ती एक नैसर्गिक प्रेरणा आहे आणि गरज देखील ! लैंगिक इच्छा मनात येते म्हणून स्वतःला दोष देऊ नको किंवा अपाराधी वाटून घेऊ नका.
मात्र प्रत्यक्ष संबंध ठेवत असताना दोन्ही जोडीदारांची इच्छा, संमती, आदर आणि सुरक्षितता मात्र महत्वाची. जोडीदार नसेल तर हस्तमैथुन हा देखील लैंगिक इच्छा शमविण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे.
सेक्सची इच्छा होणं स्वाभाविक आहे मात्र सेक्स शिवाय दुसरं काही सुचतच नाही अशी स्थिती यायला नको. असं असेल तर दुसऱ्या आवडत्या कामांमध्ये मन रमवा, छंद जोपासा. तरीही सतत सेक्सची इच्छा होत असेल तर समुपदेशकाची मदत घ्या. एवढ काही अवघड नाही. प्रयत्न कराल तर नक्की जमेल.
तुमचे अनुभव आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला शुभेच्छा !