प्रश्नोत्तरेCategory: Private Questionsex: tyala hiv sarkhay rogachi lagan tar nahi na honar?

sir mazya ek mitrane eka pursha barobar sex kela ani tyacha ase bolne ahe ki tya manssche etr 4 zanan barobar sambadh ahe ani ata to khup ghabarla ahe tya che ase bolane ahe ki tyala hiv sarkhay rogachi lagan tar nahi na honar plz sir ans dya

1 उत्तर
Answer for sex answered 7 years ago

एच. आय. व्ही./एड्स असणाऱ्या व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबध आहे तर एच. आय. व्ही. होऊ शकतो. सगळ्यात पहिल्यांदा एच. आय. व्ही. टेस्ट करून घ्या. निगेटिव्ह असेल तरीही तीन महिन्यांनी पुन्हा एकदा करा. एचआयव्हीची एका व्यक्तीकडून दुसऱ्याला शरीरातील स्रावांमधून होऊ शकतो. एचआयव्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो. एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुदा मैथुन) लागण होऊ शकते.

याविषयीची अधिक माहिती तुम्हाला खालील लिंकवरील लेखामध्ये मिळतील.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपल्या वेबसाईटवर यासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

एड्स तसेच इतर लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार होऊ नयेत सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा. कंडोम वापरा. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 14 =