प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसेक्स विषयी माहिती: 1मला सेक्स अनावर होतो काय करू 2सेक्स केल्याने पिंपल्स पण होतात काय करावे

1मला सेक्स अनावर होतो काय करू 2सेक्स केल्याने पिंपल्स पण होतात काय करावे

1 उत्तर

माणूस स्वतःच्या लैंगिक इच्छांवर नक्कीच नियञंण ठेवू शकतो.  सेक्स अनावर होतो म्हणजे सतत सेक्स करण्याची इच्छा होते की जेव्हा सेक्स ची इच्छा होते तेव्हा नियंत्रण राहत नाही याविषयी विचार करा. सेक्सची इच्छा होणे अगदी नैसर्गिक आहे पण सतत मनामध्ये सेक्सचे विचार येत असतील आणि इतर कशातच मन लागत नसेल तर मात्र इतर कामांमध्ये मन वळवा. छंद जोपासा. सर्वात महत्वाचे म्हणजे याचा तुमच्या जोडीदाराला काही त्रास तर होत  नाही ना? याची खबरदारी घ्या. जोडीदाराच्या इच्छेविरुद्ध, मर्जीशिवाय केलेला सेक्स कधीच आनंददायी असू शकत नाही. तुमच्या या समस्येबाबत मोकळेपणाने तुमच्या जोडीदाराशी बोला. तुमचा जोडीदार देखील तुम्हाला मदत करु शकेल. यातूनही तुम्हाला फायदा झाला नाही तर त्यासाठी समुपदेशकाचा सल्ला घ्या. आता वळूयात तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. सेक्स किंवा हस्थमैथुनाचा आणि पिंपल्सचा काहीही संबंध नाही. शरीरात होणाऱ्या संप्रेरकांच्या बदलामुळे (hormonal changes) पिंपल्स येतात.  

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 1 =