प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsMazi office friend 10 varshane mothi ahe ani ti mala sex sathi force karte.mi sex kela tar future madhe kahi problem tar nhi honar na

mi unmarried 28 age ahe.rozchya gym mule health Changli aahe.
Amchya Office madhe ek married women tila 2 mule hi aahet tari hi mala sex karnyasathi force karte.lift madhe canteen madhe koni nastana mazya angala hath lavte.
Mala hi ti Changli vatate..sex kela tar kahi problem nhi honar na future madhe

Pls solve my problem

1 उत्तर

तुम्ही मोकळेपणाने तुमचा प्रॉब्लेम शेअर केलात त्यासाठी तुमचे अभिनंदन! तुमचा प्रॉब्लेम खरं तर तुम्हाला स्वतःलाच सोडवायचा आहे. आम्ही तो कसा सोडवणार? आम्ही फक्त काही गोष्टी सुचवू शकतो.
एक लक्षात घ्या. एका सज्ञान व्यक्तीने दुसऱ्या सज्ञान व्यक्तीबरोबर सेक्स करायचं का नाही आणि कुणाबरोबर करायचं हे स्वतः ठरवण्याच्या गोष्टी आहेत. कुणीही असो, सेक्स करण्यासाठी तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. तुमची इच्छा असेल, मनाची तयारी असेल आणि त्या व्यक्तीबरोबर सेक्स करावंसं वाटत असेल तरच तुम्ही सेक्सचा विचार करा. तुमच्या मैत्रिणीला तुमच्याबद्दल ओढ वाटत असणार आणि म्हणूनच ती तुम्हाला सेक्सबद्दल सुचवत असणार. पण त्याबाबत काय करायचं किंवा नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या मर्जीविरोधात तुम्हाला स्पर्श करणं, तुमच्याशी जवळीक करणं तुम्हाला आवडत नसेल तर तसं तुम्ही स्पष्टपणे सांगितलं पाहिजे.
सेक्स, प्रेम या गोष्टींसाठी दोघांची संमती आणि मनाची तयारी जास्त महत्त्वाची असते. एकमेकांवर विश्वास असेल आणि मोकळेपणा असेल तर वय, हुद्दा, वयातलं अंतर या गोष्टींचा परिणाम होत नाही. तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमची मैत्रीण विवाहित आहे, तिला दोन मुलंही आहेत. तिने अशा परिस्थितीत दुसऱ्याशी सेक्स करावं की नाही हा सर्वस्वी तिने घ्यायचा निर्णय आहे. ती सज्ञान आहे, ती हे ठरवू शकते. तुम्हाला ते योग्य वाटत नसेल तर तुम्ही तिच्याशी स्पष्ट बोला. ज्या अर्थी तुमच्यामध्ये मैत्री आहे, त्या अर्थी तुम्हा मोकळेपणाने बोलू शकता, नाही का? 
कामाच्या ठिकाणी अनेकदा दोन सहकाऱ्यांमध्ये प्रेम किंवा लैंगिक संबंध असावेत का नाही याबाबत काही नियम, अपेक्षा, कोड ऑफ कंडक्ट असतो. तो जाणून घ्या. लैंगिक संबंधांचा कामावर, सहकारी म्हणून असणाऱ्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. याबाबत विचार करा. मुळात तुमची मनाची तयारी होत नाही, तुम्हाला स्वतःला तिच्यासोबत असे संबंध जोडण्याची इच्छा होत नाही तोपर्यंत असा कोणताही निर्णय घेऊ नका. दुसऱ्याची इच्छा असली तरी आपली स्वतःची तयारी आणि तशी ओढ कधीही जास्त महत्त्वाची असते.
निर्णय सर्वस्वी तुमचा स्वतःचा आहे. ऑल द बेस्ट!!!

anil replied 8 years ago

मला मैत्रीण हवी मला मैत्रीण नाही आणी सेक्स पण केला नाही आजुन.

I सोच replied 8 years ago

सेक्सकडे काहीवेळा केवळ एक शारीरिक क्रिया म्हणून पाहिले जाते. तुमची गरज म्हणून सेक्ससाठी तुम्हाला मैत्रीण किंवा स्त्री हवी आहे असे जर असेल तर त्यात असलेला धोका प्रथम समजून घ्या. स्त्रीकडे तुमची कामभावना शमविण्याची वस्तू म्हणून पाहणे हा एक अन्याय वाटत नाही का? स्त्रीला सेक्ससाठी “तयार” करण्याचे तुमचे जे काही मार्ग असतील ते तुम्ही एखाद्या स्त्रीवर वापरले आणि तिला ते मंजूर नसतील तर तो तिच्यावर ‘अत्याचार’ मानला जाऊ शकतो आणि त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. राजेंद्रकुमार पचौरी या प्रसिद्ध शास्त्रज्ञाला या कारणास्तव एप्रिल २०१६ मध्ये घरी जावे लागले हे लक्षात ठेवा. केवळ शरीरसंबंध ज्यांना हवा आहे, असे लोक वेश्यांकडे जात असतात. त्यासाठी त्यांना लिंग संपर्कातून उद्भवणारे रोग होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते.

ज्यांना जोडीदार नाही असे बरेच लोक लैंगिक गरज पूर्ण करण्यासाठी हस्तमैथुन करतात. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. हस्तमैथुन केल्याने काहीही दुष्परिणाम होत नाहीत.
तुमचे एखाद्या स्त्रीबरोबर मैत्री, प्रेम आणि आदर युक्त संबंध असतील तर त्यामध्ये स्वतःला आणि दुसऱ्या व्यक्तीला सर्वार्थाने स्वीकारले गेले असते. त्यात केवळ आवडी निवडी, आचार-विचार आणि रूढी-सवयी यांचा स्वीकार नसतो तर व्यक्ती म्हणून असलेल्या आशा आकांक्षा आणि भीती चिंता यांचा सुद्धा स्वीकार केलेला असतो. त्यातून जवळीक निर्माण झाली, त्याचा पुढचा नैसर्गिक टप्पा हा प्रेम व लैंगिक समागमात झाला तर त्यामध्ये परस्पर संमती, उभयतांचे समागमसुख आणि सुरक्षितता या गोष्टी पाळल्या जातात. याला लैंगिक संबंधातील नैतिकता असे समजणे आवश्यक आहे. ही नैतिकता लग्न झालेल्यांनाही तितकीच लागू आहे.
आधुनिक कामविज्ञानामध्ये समागमातील पूर्व क्रीडेला महत्त्व दिले आहे. त्यामुळे परस्परांचे उद्दीपन होते आणि समागम उभयतांना सुखकारक होऊ शकतो. पण हे सारे कोणासाठी? तर त्यात परस्पर संमती आणि सुरक्षितता गृहीत धरली आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 5 =