लैंगिक संबंधांमध्ये लग्न झाल आहे का नाही याने फारसा फरक पडत नाही. कंडोम किंवा निरोधचे दोन उपयोग आहेत. गर्भधारणा टाळणे आणि कोणत्याही प्रकारचे लिंगसांसर्गिक म्हणजेच लैंगिक संबंधातून पसरणारे आजार होऊ न देणे. या दोन्ही गोष्टींसाठी निरोधचा वापर आवश्यक आहे. गर्भधारणा टाळण्यासाठी इतरही गर्भनिरोधकं उपलब्ध आहेत मात्र लिंगसांसर्गिक आजार होऊ नयेत यासाठी सध्या तरी दुसरा कोणता मार्ग नाही.इतर गर्भनिरोधकांचा वापर केला नाही आणि नको असताना गर्भधारणा झाली तर ती स्त्रीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगली नाही. तो धोका आहे आणि तो स्त्रीलाच आहे.
कंडोम नाही वापरला तर तुम्हाला वेगळा त्रास नाही. मात्र स्त्रीच्या जननचक्राची नीट माहिती करून घ्या. त्यातील अंडोत्सर्जनाच्या काळात निरोध न वापरता लैंगिक संबंध टाळा. तुमच्या दोघांनाही कोणत्याही स्वरुपाचे लैंगिक आजार-इन्फेक्शन नाही याची तपासणी करून घ्या. त्यानंतर निरोध न वापरता लैंगिक संबंध ठेवायचे का नाही याचा निर्णय दोघांच्या संमतीने घ्या. निर्णय तुमचा एकट्याचा नाही तर दोघांचा आहे.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा
nice