प्रश्नोत्तरेमाझी मैत्रीण माझ्यापेक्षा 5 वर्षे मोठी आहे. तिचे लग्न झाले आहे.कंङोम वापरून sex करतोय.एकवेळ कंङोम वापरला नाहीतर काय ञास होईल .plase ans.

माझी मैत्रीण माझ्यापेक्षा 5 वर्षे मोठी आहे. तिचे लग्न झाले आहे.कंङोम वापरून sex करतोय.एकवेळ कंङोम वापरला नाहीतर काय ञास होईल .plase ans.

1 उत्तर

लैंगिक संबंधांमध्ये लग्न, वय याने फारसा फरक पडत नाही. कंडोम किंवा निरोधचे दोन उपयोग आहेत. गर्भधारणा टाळणे आणि कोणत्याही प्रकारचे लिंगसांसर्गिक म्हणजेच लैंगिक संबंधातून पसरणारे आजार होऊ न देणे. या दोन्ही गोष्टींसाठी निरोधचा वापर आवश्यक आहे. गर्भधारणा टाळण्यासाठी इतरीही गर्भनिरोधकं उपलब्ध आहेत मात्र लिंगसांसर्गिक आजार होऊ नयेत यासाठी सध्या तरी दुसरा कोणता मार्ग नाही.
तुम्हा दोघांची तयारी असेल आणि निरोध न वापरता लैंगिक संबंध ठेवल्यास या दोन्ही गोष्टींची शक्यता आहे याची तुम्हाला दोघांना पूर्वकल्पना असेल तर निर्णय तुमचा दोघांचा आहे. एक वेळ कंडोम नाही वापरला तर वेगळा त्रास नाही. मात्र स्त्रीच्या जननचक्राची नीट माहिती करून घ्या. त्यातील अंडोत्सर्जनाच्या काळात निरोध न वापरता लैंगिक संबंध टाळा. तुमच्या दोघांनाही कोणत्याही स्वरुपाचे लैंगिक आजार-इन्फेक्शन नाही याची तपासणी करून घ्या. त्यानंतर निरोध न वापरता लैंगिक संबंध ठेवायचे का नाही याचा निर्णय दोघांच्या संमतीने घ्या. निर्णय तुमचा दोघांचा आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 3 =