सेक्सी या शब्दाची तुझी व्याख्या काय आहे ? खरंतर कोणाला कोण सेक्सी वाटेल हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. ज्याकडे बघितल्यावर तुमच्या मनात लैंगिक इच्छा निर्माण होतात ते तुमच्यासाठी सेक्सी आहे.
कोण सेक्सी वाटतंय हे बघण्यासाठी कोणाकडे एकटक बघत बसू नका. कायद्याने गुन्हा आहे तो. लैंगिक छळाच्या व्याख्येमध्ये एखाद्या व्यक्तीकड तिच्या इच्छेविरुद्ध एकटक बघत बसणं हे देखील येतं. म्हणून सावधान. जरी तुम्हाला एखादी व्यक्ती सेक्सी आहे असं समजलं तरीही त्या व्यक्तीची इच्छा, संमती असल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही.