Shaving chest asked 8 years ago

Hello,

Mazya chativar ani potavar khup kes ahet ani tya mule mala oshalalyasarkha hota.

  1. Mala chati varache kes purna kadhayche ahet. Tar me razor vaparla tar chalel ka?mala hair removal creams vapraychi nahiyet.
  2. Me jevva linga varache kes kapto tya veli apoaap thodasa virya baher yeta. Hyat chinta karnyach kahi karan ahe ka?
1 उत्तर
Answer for Shaving chest answered 8 years ago

सर्वात पहिल्यांदा तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देतो. जेव्हा मुलं वयात येतात तेव्हा त्यांच्यात काही हार्मोनल बदल घडतात. अंगावर आणि चेहेऱ्यावर येणारे केस हा त्या हार्मोनल बदलांमुळे होणारा एक परिणाम आहे. त्यामुळे ते अतिशय नॉर्मल, नैसर्गिक आहे. काही मुलांमध्ये (कदाचित तुमच्या केस मध्ये) पुरुष हार्मोन टेस्टोस्टेरोन चे प्रमाण अधिक असल्याने तुमच्या अंगावर येणाऱ्या केसांचे प्रमाण जास्त असू शकते त्यामुळे त्यात ओशाळल्यासारखे वाटावे किंवा लाज वाटण्यासारखे काहीच नाही. प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने वेगळी असते त्यामुळे काहींच्या अंगावर केस जास्त असतात तर काहींच्या अंगावर कमी त्यामुळे त्याबद्दल चिंता करणे सोडून द्या. दुसरा मुद्दा हा छातीवरचे केस पूर्णपणे तेव्हाच काढतात जेव्हा छातीवर शस्त्रक्रिया करायची असेल किंवा तुम्ही एखाद्या सिनेमामध्ये काम करणार असाल. जर कोणी तुम्हाला तुमच्या छातीवरील केसांमुळे चिडवत किंवा त्रास देत असेल तर एक तर तुम्ही त्यांना स्पष्टपणे तसं सांगा किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्यांच्या चिडवण्याने स्वतःला त्रास करून घेऊ नका. ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्या गोष्टी बळजबरीने केल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ हेअर रिमूवर क्रीम वापरल्याने किंवा ब्लेड वापरल्याने स्किनवर rash येणं किंवा जळजळ होणं असे प्रकार होऊ शकतात त्यामुळे स्वतःच्या शरीराचा आदर करा, त्यावर प्रेम करा, त्याला आहे त्या पद्धतीने accept करा.
आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर – कधी कधी आपण आपल्या स्वतःच्या अवयवांना हात लावतो तेव्हा लैंगिक उत्तेजना निर्माण होऊ शकते. ते नैसर्गिक आहे. खासकरून लिंगाच्या आसपास चा भाग खूप संवेदनशील असतो. तिथे खूप साऱ्या रक्तवाहिन्यांचे जाळे असते. त्यामुळे आपल्या मनातील लैंगिक भावना व लिंगाला हात लावताना लिंगउत्तेजना या दोन्ही गोष्टींच्या एकत्रित प्रभावामुळे वीर्यस्खलन होऊ शकते. त्यामुळे चिंता करू नका. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लिंगावरील केस काढताना काळजी घ्या कारण ब्लेडच्या वापराने लिंग किंवा लिंगाच्या आसपासच्या भागाला इजा पोचू शकते. त्यामुळे शक्यतो अशा तीक्ष्ण गोष्टींचा वापर करणे टाळा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 7 =