प्रश्नोत्तरेShaving of private parts
Shaving of private parts asked 9 years ago

Laingik avayavanchi swacchata rakhnyasathi purna shaving karana avashyak aste ka? Tya sathi razor cha vapar yougya tharel ka?

1 उत्तर

लैंगिक अवयवांची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. मात्र त्यासाठी पूर्ण शेविंगची किंवा सगळे केस काढून टाकण्याची गरज नाही. लैंगिक अवयवांवरची त्वचा अतिशय नाजूक असते आणि त्यामुळेच अवयवांच्या रक्षणासाठी तिथे केस असतात. कात्रीचा वापर करून केस बारीक कापता येतात. रेझरचा वापर शक्यतो टाळा कारण त्वचेला इजा होऊ शकते.
रोज अंघोळीच्या वेळी लैंगिक अवयव साफ करा. जास्त उग्र वासाच्या साबणांचा वापर टाळा. त्यानेही त्वचेचे विकार होऊ शकतात. मुलींनी योनीमार्गाच्या आसपास डिओ किंवा इतर परफ्यूमचा, उग्र वासाच्या पावडरचा वापर टाळावा. त्यातील रसायनांचा जननसंस्थेवर विपरित परिणाम होऊ शकतो.
आतले कपडे घाम टिपून घेतील असे सुती असावेत. रोजचे रोज बदलावे. आणि धुऊन कोरडे करावे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 20 =