का ओळखायचे आहे ते? त्याने काय होईल असे तुम्हाला वाटते? मुलगी कुमारी आहे की नाही हे कळणे का महत्वाचे असते? आणि मुलग्यांचे काय? त्यांच्या शीलाचे काय? आणि सील म्हणजे काय? काय मुलगी किंवा बाई ही वस्तू असते जिचे सील तुटून ती ‘वापरलेली’ बनते. पहा ही घाणेरडी आणि सडलेली विचारसरणी आपल्याला माणूसपणापासून किती कोसो दूर नेते! आपण काय विचार करतो, का करतो याचाही कधी तरी विचार करा की मित्रांनो.
स्त्रीच्या योनीमार्गात योनिपटल (hymen) नावाचा लवचिक पडदा असतो. हा पडदा सेक्सशिवाय इतरही गोष्टींनी उदा. शारीरिक हालचाली – जसं धावणे, पोहणे, सायकल चालवणे, खेळ यामुळेही फाटू शकतो.