प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsSir prasuti nanatar amhi yek week madhe sex kela.dusarya divashi mi tila \\\

Sir prasuti nanatar amhi yek week madhe sex kela.dusarya divashi mi tila \\"i pill \\" dili mag ti tarihi preganat rahu shakate ka ???

1 उत्तर

मुळात बाळंतपणानंतर एका आठवड्यात लैंगिक संबंध ठेवण्याची तुमची जोडीदाराची मानसिक आणि शारीरिक तयारी आहे का ? याचा विचार करायला पाहिजे. अधिक माहितीसाठी बाळंतपणानंतरचे लैंगिक संबंध याविषयी खालील लेख वाचा. https://letstalksexuality.com/sex-after-delivery/

असुरक्षित संबंधांनंतर म्हणजेच तांबी, गर्भ निरोधक गोळ्या (उदा. माला डी), होर्मोनचे इंजेक्शन, यासारखे कुठलेही साधन वापरलेले नसेल किंवा त्यांचा अनियमित वापर असेल, संबंधांच्या वेळी कंडोम वापरला नसेल किंवा कंडोम फाटला, तर गरोदरपण राहण्याची शक्यता असते. अशा वेळी आय पिलसारख्या गोळ्या घ्यायच्या असतात. असुरक्षित संबंधांनंतर पुढच्या ७२ तासांच्या आत गोळ्या घेतल्यास गर्भधारणा टाळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. म्हणूनच ‘मॉर्निंग आफ्टर पिल्स’ हे संबोधन फारसं बरोबर नाही. जितक्या लवकर या गोळ्या घेतल्या जातील तितकं चांगलं. असुरक्षित संबंधांनंतरच्या पहिल्या १२ तासात या गोळ्यांचा फायदा सर्वाधिक असतो.

अर्थात, संतती नियमनासाठी पूर्णपणे किंवा फक्त या गोळ्यांवर अवलंबणे चूकच ठरेल. या गोळ्या फक्त ‘इमर्जन्सी’ साठी आहेत. हे नेहमी वापरावयाचे संतती नियमनाचे साधन नाही. एकाच मासिक पाळीच्या चक्रात (menstrual cycle) अनेकदा या गोळ्या घेणं आरोग्याला अपायकारक ठरू शकतं. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/ecp

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 16 =