Smoking and sex asked 7 years ago

Me 24 yrs girl aahe..and mi far smoking karte ata next month lagn hoil tar sex war kahi parinam hoil ka.. jyachya barobar lagn aahe tyala he mahit nahi karan tyala smoking awadat nahi..tar tyala sex kartana samjel ka?

1 उत्तर
Answer for Smoking and sex answered 7 years ago

लग्नानंतर तू हे व्यसन सुरु ठेवणार असशील तर कधी ना कधी हे जोडीदाराच्या लक्षात येईल याची शक्यता नाकारता येत नाही. वैवाहिक जीवनात मतभेद होऊ नयेत म्हणून तुझ्या या सवयीबद्दल जोडीदाराला आधीच सांगणे योग्य ठरेल. हे तितकं सोप्पं नाही हे मी समजू शकते पण कोणत्याही नात्यामध्ये पारदर्शकता असेल तर ते नाते अधिक विकसित होण्यास मदत होते. शेवटी निर्णय तुझा.

शिवाय सिगारेटच्या व्यसनाचा शारीरिक, लैंगिक आणि प्रजनन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. सिगारेटमध्ये तंबाखू असते. सिगारेटच्या धुरातून अनेक रसायनं शरीरात जातात. उदा. निकोटीन, टार, CO. ‘टार’ सिगारेट ओढणाऱ्या लोकांच्या दातांना पिवळी बनवतो, हाताच्या बोटांना लागल्यावर बोटं देखील पिवळी दिसायला लागतात. खूप सिगारेट ओढणाऱ्या लोकांमध्ये छातीचे विकार आणि फुप्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर त्यांच्या लैंगिक, प्रजनन आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतात. स्त्रियांमध्ये लवकर रजोनिवृत्ती (पाळी जाणे) येणे. गरोदर महिलांचा गर्भ पडणे, कमी वजनाची मुलं जन्माला येणं, प्रीमॅच्युअर प्रसूती होणं असे परिणाम दिसतात.

तुला या व्यसनातून बाहेर पडायचे असेल तर एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रातील सामुपकदेशकाची मदत घे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 20 =