प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsSmoking cha men's chya sex life vr n sperm vr Kay Paribas hoto

1 उत्तर

सिगारेटच्या व्यसनाचा शारीरिक, लैंगिक आणि प्रजनन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. सिगारेटमध्ये तंबाखू असते. सिगारेटच्या धुरातून अनेक रसायनं शरीरात जातात. उदा. निकोटीन, टार, CO. ‘टार’ सिगारेट ओढणाऱ्या लोकांच्या दातांना पिवळी बनवतो, हाताच्या बोटांना लागल्यावर बोटं देखील पिवळी दिसायला लागतात. खूप सिगारेट ओढणाऱ्या लोकांमध्ये छातीचे विकार आणि फुप्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर त्यांच्या लैंगिक, प्रजनन आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतात. खूप प्रमाणात सिगारेट पिणाऱ्या पुरुषांच्या पुरुषबीज निर्मितीवर विपरीत परिणाम होतो. रक्तवाहिन्या अरुंद होऊन (अॅथेरोस्कलेरॉसिस) लिंगाला उत्तेजना येण्यास अडचण येते.

सिगारेटच्या व्यसनातून बाहेर पडायचे असल्यास एखाद्या समुपदेशक किंवा व्यसनमुक्ती केंद्राची मदत घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 1 =