प्रश्नोत्तरेsomvari,ekadashi,devsi sex karayla jamto ka,sex kelyanatar ankhol karunch baher jave ka

1 उत्तर

दोघांची इच्छा, संमती, मानसिकता आणि तयारी असेल तर सेक्सला काळ वेळाची मर्यादा नाही. सेक्स कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी, कुठे आणि कसा करावा हा सेक्स करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यातील व्यक्तिगत बाब आहे. हा निर्णय सर्वस्वी सेक्स करणाऱ्या व्यक्तींचा असायला हवा. पौर्णिमा, अमावास्या, एकादशी आणि सोमवार यावरून सेक्स करावा का नाही हे ठरविण्यापेक्षा दोघांची संमती, मानसिक तयारी, विश्वास आहे का, नको असलेली गर्भधारणा आणि लिंगसांसर्गिक आजार होऊ नये म्हणून योग्य ते गर्भनिरोधक वापरले आहे का, याचा विचार करणे अधिक योग्य ठरेल.

राहिला प्रश्न अंघोळीचा. सेक्स करून अंघोळ न करता जरी बाहेर पडले तरी काही धोका नाही. आरोग्याच्या दृष्टीने लैंगिक संबंधांआधी आणि नंतर लैंगिक अवयवांची स्वच्छता राखणे मात्र आवश्यक आहे.

समाजात लैंगिक संबंध, लैंगिकता आणि इतर अनेक गोष्टींविषयी देखील अनेक गैरसमज, अंधश्रद्धा दिसून येतात. आपण मात्र या गोष्टींकडे अधिक डोळसपणे आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहायला हवं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 4 =