आईचा रक्तगट आरएच निगेटिव्ह (Rh negative) असेल आणि जर तीला आरएच पॉझिटीव्ह (Rh positive) रक्तगट असलेले बाळ झाले तर मात्र आईला पहिल्या बाळंतपणानंतर किंवा गर्भपातानंतर ४८ तासांच्या आत एक इंजेक्शन घ्यावे लागते. जर इंजेक्शन घेतले नाही तर आईला ऍन्टीबॉडीज म्हणजेच काही विशिष्ट प्रकारच्या री-अॅक्शन येऊ शकतात. तसेच जर तीला पुन्हा पुढच्या वेळी देखील आरएच पॉझिटीव्ह (Rh positive) रक्तगट असलेले बाळ झाले तर त्या बाळावर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते.
ज्या व्यक्तीचा रक्तगट आरएच निगेटिव्ह (Rh negative) आहे त्यां गरोदरपण आणि विशेषतः बाळंतपणादरम्यान डॉक्टरांच्या हे आवर्जून निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे. बाकी चिंता करण्याचं काहीही कारण नाही.