suggestion asked 8 years ago

aakashvani ya movie vr kahi tr sangave

lekh vagaire

1 उत्तर
Answer for suggestion answered 8 years ago

तुमच्या सुचनेबद्दल आभारी आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला आकाशवाणी हा चित्रपट आकाश आणि वाणी यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. वाणी च्या आकाशवरील प्रेमाबद्दल कळाल्यानंतर समाजाच्या भीतीने वाणी चे कुटुंबीय तिच्या इच्छेविरुद्ध तिचे लग्न लावून देतात. तिचा नवरा तिच्यावर अनन्वीत लैंगिक अत्याचार करतो. शेवटी वाणी नवऱ्यापासून घट स्फोट घेते आणि आकाशबरोबर लग्न करते असे कथानक असलेला हा चित्रपट आहे. इच्छेविरुद्ध लग्न , प्रेम, नातेसंबंध , त्यातील गुंतागुंत, लग्न ठरवताना स्त्री च्या निर्णयाला असणारे स्थान, विवाहांतर्गत होणारे बलात्कार यांसारखे विषय या चित्रपटामध्ये हाताळले गेले आहेत. प्रत्यक्ष जरी या चित्रपटाचा review अथवा यावर आधारित लेख लिहिला नसेल तरीही आपल्या https://letstalksexuality.com या वेबसाईट वर प्रेम frame, लिंगभावाची व्यवस्था , मेरी मर्जी, छळ आणि हिंसाचार, या मथळ्यांखाली तसेच isochpune या फेसबुक पेज वर आम्ही या चित्रपटात हाताळलेल्या गेलेल्या प्रश्नांविषयी लिहिले गेलेले लेख, कविता, घटना, बातम्या, पोस्टर्स नेहमी पोस्ट करत असतो ते नक्की वाचा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 8 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी