प्रश्नोत्तरेtb असले तर sex करावा का,काही परिनाम

1 उत्तर

क्षय रोगाचे जंतू हवेतून पसरतात. फुफुसाचा क्षय असलेला रुग्ण जेवण खोकतो, शिंकतो, बोलतो किंवा गाणे म्हणतो तेंव्हा त्याच्या तोंडावाटे हे जंतू हवेत पसरतात. ते श्वासावाटे दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. क्षय असलेया व्यक्ती सोबत हस्तांदोलन, चुंबन किंवा गळाभेट घेतल्याने क्षयाचे जंतू पसरत नाहीत. परंतु क्षयाने आजारी असलेल्या (लक्षण दिसत आहेत अशी व्यक्ती) व्यक्तीच्या थुंकित क्षयाचे जीवाणू असतात आणि त्यांची लागण चुंबन घेणाऱ्या व्यक्तीला होवू शकते. लैंगिक संबंधातून हे जंतू सहसा पसरत नाहीत. परंतु जर प्रजनन अवयवाचा क्षय असेल तर मात्र लैंगिक संबंधातून हे जंतू पसरू शकतात. क्षयाचे जंतू कपडे, त्वचा किंवा भांडे यांना चिटकत नसतात. बंद, अरुंद, कोंदट जागी, मोकळी हवा किंवा सूर्यप्रकाश नसलेल्या जागी क्षयाच्या जंतूंचा प्रसार झपाटयाने होतो. प्रतिकार शक्ती कमजोर असलेल्या व्यक्ती या आजारला लवकर बळी पडतात.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 13 =