1 उत्तर
हो, तशी शक्यता असते. ताणतणावाचा परिणाम शरीरातील ग्रंथींच्या आणि संप्रेरकांच्या कार्यावर होऊ शकतो ज्यातून पाळी चक्र बदलू शकते. स्त्री बीजाच्या परिपक्व होण्याच्या वेळेवर परिणाम होऊन गर्भधारणेत अडथळा येऊ शकतो. कधी कधी तणावाची सवय शरीराला होवून जाते आणि शरीर स्वतःला त्यानुरूप बनवते पण अचानक उद्भवलेल्या तणावपूर्ण स्थितीत उदा. घरात कोणाला काही अपघात झाला किंवा कोणाचा मृत्यू झाला तर शरीराच्या चक्रावर त्याचा परिणाम होतो. अर्थात प्रत्येक व्यक्तीनुसार यात भिन्नता असते.
आपले उत्तर प्रविष्ट करा