मुळात तुम्हाला टेस्टेस्टेरॉन का वाढवायचे आहे ? तुम्हाला तुमच्या शरीरात टेस्टेस्टेरॉनचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी आहे असे वाटते का ? हे वैद्यकीय तपासणीतून समोर आले आहे की तुम्ही कोणाकडून ऐकले आहे ? या प्रश्नांची उत्तरे शोधा.
पुरुषांमध्ये टेस्टेस्टेरॉनचे प्रमाण कमी असल्यावर लिंग ताठ होण्यामध्ये अडचण, समस्या, शीघ्रपतन, लैंगिक इच्छा कमी होणं, गर्भधारणेमध्ये अडचण, केसांची मोठ्या प्रमाणात गळती, स्नायू कमी होणं, शरीरातील चरबी वाढणं, स्तन वाढणं, झोप येण्यात अडचण येणं, नैराश्य येणं आधी काही लक्षणं दिसू शकतात. अशी काही लक्षणं दिसत असतील डॉक्टरांशी संपर्क साधा.
डॉक्टरच तुम्हाला आवश्यकतेनुसार औषधोपचार आणि आहार सुचवू शकतील.