Testicles

334
S.A.T. asked 3 months ago

वय26 . वयाच्या 14 व्या वर्षी सेक्सबद्दल आकर्षणामुळे मित्रासोबत गुदा सेक्स करताना माझी फोरस्किन खालच्या साईड ने ब्रेक झाली. (सील तुटलं). वयाच्या 23 व्या वर्षी पहिल्यांदा सेक्स करताना स्त्री सोबत जाणवलं की माझ विर्यपतन होत. कधी intercourse च्या अगोदर तर कधी intercourse सुरू झाल्यावर 1 ते 2 मिनिट मध्ये विर्यपतन होतं. सध्या मी कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये नाही. पण आफ्टर Masturbate करून झाल्यावर अथवा बाईक चालवून झाल्यावर निदर्शनास येत की माझ्या अंडकोषाच्या Scrotum डाव्या बाजुच्यावर अंडकोश मध्ये तिसरी testis असल्याचे जाणवते.. थोडया वेळात पूर्ववत होते. मी straight आहे. हस्थमैथून करते वेळी पण 1 मिनिट मध्ये ejuclation होत. लिंगाची साईझ लहान आहे असे वाटते.. 4 ते 5 इंच काही उपाय?

1 Answers
let's talk sexuality answered 3 months ago

तुम्ही जे सांगत आहात या बाबी पुरुषांच्या बाबतीत फार नॉर्मल आहेत. जसे की, Frenulum तुटणं हे खूप मुलांच्या बाबतीत घडते हे नॉर्मल आहे. तसेच 1-2 मिनिटामध्ये (सेक्स वा हस्तमैथुन करतानाही) वीर्यपतन होणे हे ही साहाजिक आहे.

एकापेक्षा जास्त अंडकोष असणे याला Polyorchidism असं म्हटलं जातं, अशाप्रकारच्या फार कमी केसेस आहेत. तुमच्या बाबतीत काही परिस्थिती नंतर जर असं होत असेल तर आपण स्वत: काही निदान न करता युरोलॉजिस्ट (मुत्रविकारतज्ञ) ना भेटून घ्याल.

या विषयावर बोलायचे असल्यास आपला आणखी एक उपक्रम आहे नेस्टस् फॉर युथ. इथे समुपदेशकाशी तुम्ही या प्रश्नावर बोलू शकाल. 9561744883 (इथे क्लिक करु शकता) या नंबरच्या व्हाट्सअप वर मेसेज करुन वेळ ठरवून मोकळेपणाने बोलता येईल. हा उपक्रम संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क आहे