प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ्या Testies खूप खाली ताणल्या गेल्या आहेत.गाडीवर बसल्यावर व जास्त वेळ चालल्यावर खूप दुखतात.तर यावर उपाय काय ?

माझ्या Testies खूप खाली ताणल्या गेल्या आहेत.गाडीवर बसल्यावर व जास्त वेळ चालल्यावर खूप दुखतात.तर यावर उपाय काय ?Testies पुन्हा वर कशा घ्यायच्या ?Ladies Panty वापरली तर ठीक होईल का ?माझ्या

1 उत्तर
Answer for Testies answered 11 months ago

वृषण (Testies) ताणले जाणं किंवा सैल होणं ही वयोमानानुसार घडणारी सामान्य गोष्ट आहे. त्यासाठी कोणतेही वेगळे उपचार करण्याची गरज नसते. परंतु जर तुम्हाला दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच त्यासाठी लेडीज पॅनटी वापरायची गरज नाही. पुरुषांनी वापरायच्या अंडरवेअर ज्या फार घट्ट किंवा सैल नाहीत त्या तुम्ही वापरू शकता. वृक्षणाच्या आजूबाजूच्या स्नायूंमध्ये घट्टपणा आणण्यासाठी, सैलपणा कमी करण्यासाठी तुम्ही खाली सांगितलेला व्यायाम करू शकता.

केगेल व्यायाम करण्याची पद्धत –

सुरुवातीला कोणते स्नायू रोखून ठेवायचे हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी लघवी करत असताना ती मध्येच थांबवा, रोखून धरण्यासाठी ज्या स्नायूंचा वापर होतो ते स्नायू केगेल व्यायामाशी संबंधित आहेत.

व्यायामाचे टप्पे-

• योग्य स्नायू ओळखा

• पाच सेकंद स्नायू आतमध्ये रोखून धरा. मग पाच सेकंद स्नायू शिथिल करा. हीच कृती चार-पाच वेळा करा.

• एकदा हे करायला जमलं की स्नायू आत ओढून घेण्याचा काळ 10-12 सेकंदांपर्यंत वाढवा

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 6 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी