प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ्या मित्राचे वय 30 आहे आणि त्याच्या बायकोचे 24 वर्ष।।त्यांच्या लग्नाला 7 वर्ष झालीत ।त्यांना 2 मुले आहेत।दोन्हीही वेळा त्या नॉर्मल प्रसूत झाल्या….मात्र त्यांची अडचण अशी होतेय कि योनीमध्ये लिंगप्रवेश झाल्यावर खूपच सैलपण जाणवतो… पहिल्या प्रसूतिवेळी त्यांना टाके मारावे लागले होते दुसऱ्यांदा नाही…. सैलपणा कसा घालवावा किव्हा लिंगात ताठरपणा कमी झाला असेल का?
1 उत्तर

बाळंतपणानंतर पुरेशी विश्रांती मिळाली नाही तरी योनीमार्गाच्या स्नायूंवर ताण येऊन ते सैल पडू शकतात. त्यासाठी केगेल व्यायाम उपयोगी पडू शकतात. त्याची माहिती पुढील उत्तरात दिली आहे.
https://letstalksexuality.com/question/kegel-exercise/
लिंगामध्ये ताठरपणा कमी वाटत असेल तर त्यासाठी आहार सुधारायला पाहिजे. चांगला आहार, व्यायाम आणि चिंतामुक्त जीवनशैली शरीराचं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आवश्यक आहे. रक्ताभिसरण सुधारलं की लिंगाचा ताठरपणाही वाढतो.
वरील उपायांनी फरक न पडल्यास सेक्सॉलॉजिस्टना अवश्य भेटा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 8 =