टुडे गोळ्या कोणत्याही औषधांच्या दुकानात मिळतात. या गोळ्या शुक्राणूनाशक म्हणजेच पुरुषबीजांचा नाश करणाऱ्या पदार्थांच्या बनलेल्या असतात. या तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या नाहीत. लैंगिक संबंधांदरम्यान संभोगाच्या किमान 20 मिनिटं आधी एक गोळी स्त्रीच्या योनीमार्गामध्ये जितकी आत शक्य आहे तितकी आत सरकवून ठेवायची. हे करताना बोटं स्वच्छ असणं आणि सावकाशपणे ही गोळी आत ठेवणं गरजेचं आहे. ती मेणासारख्या पदार्थांची बनलेली असते आणि त्यामुळे योनीमार्गामध्ये ठेवल्यावर ती वितळते. वीर्यातील पुरुषबीजं या गोळीतील पदार्थामुळे नष्ट होतात आणि त्यामुळे गर्भधारणा होत नाही.
मात्र पाळीच्या मध्यावर जेव्हा अंडोत्सर्जन होण्याची शक्यता सर्वात जास्त असते तेव्हा फक्त टुडे गोळ्या वापरून उपयोग होईलच असं सांगता येत नाही. तेव्हा निरोधही वापरायला हवा कारण गर्भधारणेची शक्यता तेव्ही सर्वात जास्त असते.
काही स्त्रियांना या गोळीतील पदार्थामुळे योनीमार्गामध्ये खाज सुटू शकते तसंच काही पुरुषांनाही याचा त्रास होऊ शकतो. तसं काही जाणवल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा