सेक्स करणं ही एक जबाबदार कृती आहे. तुम्ही ज्या व्यक्तीसोबत संभोग करता आहात त्याची संमंती असणं फार महत्वाचं आहे. अन्यथा संमंतीशिवाय़ केलेला कोणताही संभोग हा बलात्कारच असतो. त्यामुळं तुम्ही विचारलेल्या प्रश्नामध्ये तुमची इच्छा होत असेल परंतू जोडीदाराची देखील संमंती असणं फार महत्वाचं आहे.
आता तुमच्य प्रश्नाविषयी बोलू या. एका दिवसा दोन वेळा संभोगाची इच्छा होणं यात गैर काहीच नाही. परंतू सलग दोनवेळा संभोग करायचा असेल तर तुमची आणी जोडीदाराची मानसिक आणि शारीरिक तयारी हवी. कारण संभोग करणं हे मनाला आणि शरीराला आनंदासोबतच थकवा देणारी कृतीदेखील आहे. कदाचित सलग दोनवेळा संभोग करताना पहिल्या संभोगानंतर शरीराला किंवा लिंगाला आणि मनाला थकवा आला असेल त्यामुळं लिंगामध्ये ताठरता येत नसेल.
जर दिवसातून वेगवेगळ्या वेळेला संभोग करण्याची इच्छा होते परंतू लिंगामध्ये ताठरता येत नाही, अशावेळी जोडीदाराशी बोला. त्याला तुमच्या समस्येबद्दल कल्पना द्या. कदाचित जोडीदाराच्य कामुक स्पर्शामुळं किंवा कृतीमुळं तुम्हाला उत्तेजना येण्यास मदर मिळेल. जर यातूनही समस्या सुटली नाही तर प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला फायदेशीर राहील.