Urinary tract infection नेमके होण्याची कारणे ? झाल्यासकाय काळजी घ्यावी ? मागील आठवड्यात मी खूप suffer झालो त्यामुळे , डॉक्टरांनी 5 दिवसांचे औषध दिले आराम पडला मात्र दरवर्षी मला हा त्रास ह्या दिवसांमध्ये होतो , dr लाविचारलेbut he cant said any more
जंतू संसर्ग, जंतूंच्या संपर्कात आल्यामुळे होतो. आतले कपडे स्वच्छ नसणे, प्रजनन अवयवांची नियमित स्वच्छता राखली न जाणे, या कारणांसोबतच असुरक्षित लैंगिक संबंध, अनेक जोडीदार असणे, मधुमेह मुत्रवाहिनी आणि मुत्र पिशवीच्या जंतू संसर्गाला कारणीभूत ठरू शकतात. उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात पाणी कमी होणे, किडनी स्टोन मुळे किडनीच्या कामात अडथळे येणे अशा कारणांमुळेही हा संसर्ग होतो. तुमच्या डॉक्टरांनाच तुम्ही थोडा वेळ घेवून हे विचारा अथवा योग्य त्या डॉक्टर कडे सल्ला घ्या.