1 उत्तर

तुम्हाला वीर्यातील पुरुष बीजाचे आयुष्य विचारायचे आहे काय? वीर्य म्हणजे एक द्रव पदार्थ असतो ज्यात पुरुष बीज तरंगत असतात. स्खलन जर योनीत झाले असेल तर पुरुष बीज साधारणपणे ४-५ दिवस जिवंत राहतात. म्हणूनच पाळी चालू असताना संबंध आले असतील तरीही क्वचित गर्भधारणा होऊ शकते. शरीराच्या बाहेर पुरुषबीजांचा हवेशी संपर्क आला तर ते लगेच नष्ट होतात. त्यांना अनुकूल अशा वातावरणातच ते जिवंत राहू शकतात जे योनीमार्ग, गर्भाशयाचे मुख आणि गर्भाशय पुरविते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 1 =