what is sex......? asked 9 years ago

What is sex in details?

1 उत्तर
Answer for what is sex......? answered 9 years ago

सेक्स या शब्दाचे अनेक अर्थ आहेत.
फॉर्ममध्ये आपण सेक्स हा कॉलम भरतो तेव्हा तो स्त्री, पुरुष किंवा इतर अशा अर्थाने असतो. गर्भधारणा होते तेव्हाच जन्माला येणाऱ्या बाळाचं लिंग ठरतं.
सेक्सचा दुसरा अर्थ म्हणजे दोन व्यक्तींमध्ये होणारे लैंगिक संबंध. यामध्ये विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. शारीरिक जवळीक, स्पर्श, प्रणय आणि संभोग अशा विविध प्रकारे लैंगिक संबंध ठेवले जातात. संभोग म्हणजे पुरुषाचे लिंग स्त्रीच्या योनिमध्ये प्रवेश करणे. संभोगाचे इतरही प्रकार आहेत. त्याविषयी सेक्स बोलें तो हा विभाग पहा. letstalksexuality/category/talking-aout-sex/ वाचा.
तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या जास्त जवळ जावंसं वाटत असतं किंवा जेव्हा तुम्ही लैंगिकदृष्ट्या उत्तेजित झालेले असता तेव्हा तुम्ही सेक्स करता किंवा तुम्हाला सेक्स करण्याची इच्छा निर्माण होते. सेक्स करण्यामध्ये, प्रेम करण्यामध्ये आणि शरीर संबंध ठेवण्यामध्ये पाप किंवा घाण असं काही नाही. आपली जवळीक आपण या क्रियांमधून व्यक्त करत असतो. मात्र ही जवळीक दोन्ही जोडीदारांच्या संमतीने व्हायला हवी. सेक्स करण्याची भावना ही अगदी आदिम भावना आहे आणि त्यात घाण असं काही नाही हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण ती तितकीच जबाबदारीची आणि एकमेकांचा आदर ठेवून करण्याची कृती आहे बरं. करा आणि मोकळे व्हा असं चालत नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 3 =