Without Condom

259
Abhi asked 1 month ago

Hello, Me 23 varshacha ahe. Without condom sex kelyavr pregnancy honyachi shakyata aste ka? pn semen yoni madhe shirle nahi.ani blowjob kelyavr cancer hoto ka? Blowjob karanyasthi kahi tips have ahet. semen swallow kelyavr kahi sides effect hotat ka?

1 Answers
let's talk sexuality answered 1 month ago

हो निरोधशिवाय लैंगिक संबंध आल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता असते.

गर्भधारणा होईल की नाही याबाबत काही सांगू शकत नाही. फार शक्य – अशक्यांचा खेळ आहे. कसलीच खात्री नाही देऊ शकत,जरी वीर्य योनीमार्गात नाही गेलं तरी. त्यामागे आणखी एक कारण हे ही असू शकतं की, लिंगाच्या मुळाजवळ दोन कौपरग्रंथी नावाच्या ग्रंथी असतात. यांच्यात एक पारदर्शक स्त्राव तयार होतो. संभोग करताना वीर्यपतन व्हायच्या अगोदर या ग्रंथीतल्या स्त्रावाचे काही थेंब लिंगातून बाहेर येतात. याला प्रीकम म्हणतात. या प्रीकम मध्येही काही पुरुषबीजे/शुक्राणू असण्याची शक्यता असते.

मुखमैथुन केल्याने जर HPV (ह्यूमन पॉप्युलोमा व्हायरस )चा संसर्ग झाल्यास खूपच क्वचित प्रसंगी तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच जर असुरक्षितपणे (निरोध वा डेंटल डॅम न वापरता) मुखमैथुन केले असल्यास लिंगसांसर्गिक आजारांची लागण मात्र होऊ शकते. वीर्य पोटात गेल्याने काही त्रास नाही होत पण असुरक्षित मुखमैथुन टाळणे कधीही उत्तम. मुखमैथुन करताना टिप्स एवढीच की, सुरक्षितता घ्या म्हणजे निरोध वा डेंटल डॅमचा वापर करा. अधिक माहितीकरिता हि लिंक पहा https://letstalksexuality.com/dental-dam/